शिरूर रामलिंग रस्त्यावर घोटी मळ्याकडे जाणाऱ्या गायरान जमिनीत थांबलेल्या स्विफ्ट कारमधून मांडूळ साप बाळगणाऱ्या दोघांना शिरूर पोलीस पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून एक मांडूळ साप जप्त करण्यात आले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिले आहे.
याप्रकरणी देवदास ईमराज भोसले (वय ५१ वर्ष रा. मुखई, ता शिरूर जि पुणे)धनेश्वर दुर्यभान भोसले( वय ३५ वर्ष, रा. गणेगाव खालसा ता शिरूर जि पुणे) या दोघांना अटक केली आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिरूर पोलीस स्टेशनचे तपास पथक शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की शिरूर रामलिंग रस्त्यावर रामलिंग जवळ घोटीमळा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला गायरान जमिनी जवळ दोन इसम स्विफ्ट कार मधून मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आली आहे. त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत. सदरची माहिती समजताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार विजय शिंदे, सचिन भोई, नितेश थोरात, निखिल रावडे,अजय पाटील, निरज पिसाळ,पोलीस अंमलदार विजय शिंदे यांनी त्या ठिकाणी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या गाडीची तपासणी केली असता एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मांडूळ जातीचा साप चार फूट लांब आढळून आला आहे.
पोलिसांनी फिर्यादीवरून दोघा जणांना अटक केली असून,वन्य संरक्षण अधिनियम १९७२चे कलम ४८ (अ), ३९ (३) (अ), ५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ, निखील रावडे, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे