हवेलीतील फुलगावमध्ये गाईच्या दोरीत अडकल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा हृदयद्रावक अंत

9 Star News
0
हवेलीतील फुलगावमध्ये गाईच्या दोरीचा फास; आठ वर्षीय चिमुकल्याचा हृदयद्रावक अंत
शिरूर प्रतिनिधी 
फुलगाव (ता.हवेली) अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाच्या हातात गाईला बांधलेली दोरी अडकली. याचवेळी गाई पळत सुटल्याने चिमुकला ओढत नेल्याने डोक्याला जोरदार मार लागल्याने व गळ्याला फास बसल्याने गंभीर जखमी होवून चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला. सदरची घटना पुण्याच्या हवेली तालुक्यातील फुलगाव येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
शौर्य शैलेश वागस्कर (वय ८) असे सदर घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. 
      शौर्य हा अंगणात खेळत होता. खेळत असताना त्याने अंगणातील गाईला बांधलेली दोरी हातात घेतली. हि दोरी मोठी होती. मात्र यावेळी गाई पळत सुटल्याने या दोरीचा शौर्यच्या गळ्याभोवती व अंगावर फास बसला. यामुळे तो गाईच्यामागे दोरीमुळे ओढत गेल्याने त्याला जबर मार लागला. एकुलता एक मुलगा गमावला

घटना घडली यावेळी शेजारील महिलेने पाहिले असता मुलगा कोणाचा यावरून पाच ते दहा मिनिटात सर्व जमा झाले तेव्हा शौर्य गंभीर जखमी अवस्थेत दिसून आला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला परंतु त्याचा उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. तो फुलगाव येथील शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होता. तर घरात तो एकुलता एक मुलगा होता. लोणीकंद पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!