मांडवगण फराटा फराटवाडी येथे घराच्या अंगणात खेळणाऱ्या चार ते पाच वर्षीय चिमुकल्यावर ऊसाच्या शेतातून आलेल्या नरभक्षक बिबट्याने हल्ला करून त्याला शेतात उचलून नेले होते यात चिमुकल्याचा मृत्यू झाला असून, ही घटना भयानक होती या हल्ल्यात बिबट्याने चिमुकल्याच्या तोंडाकडील भागाचा लचका तोडला. ही दुर्दैवी घटना घडली असून, मांडवगण फराटा येथील नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
आज १५ नोव्हेंबर सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
शिवतेज दिपक टेंभेकर (वय ५ वर्षे रा.फराटवाडी, मांडवगण फराटा शिरूर)असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे
आज दिनांक 15 नोव्हेंबर सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान शिवतेज घराच्या अंगणात खेळत होता आजी आजोबा जवळच होते कुटुंबी घरात जवळच होते घराच्या बाजूला असणाऱ्या उसाच्या शेतातून अचानक बिबट्याला व त्याने आजी आजोबा समोरच शिवतेज याच्यावर हल्ला करून त्याला उचलून नेले हे कुटुंब यांच्या लक्षात आले त्यांनी आरडाओरडा केला नागरिक आले व त्यांनी उसाच्या शेतात शिवतेज याचा शोध घेतला त्यावेळेस चिमुकला मृत अवस्थेत सापडला आहे .
तर परवाच मांडवगण फराटा येथे एका दुचाकी च्या पाठीमागे दोन बिबटे पळत असल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर १९ ऑग्क्टोबर रोजी मांडवगण फराट्यातच एका चिमुकल्याला अशाच प्रकारे बिबट्याने हल्ला झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर ही या भागातील दुसरी घटना आहे.
१९ ऑक्टोबर रोजी असेच आई समोरच बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला केला होता त्याचा मृत्यू झाला होता. एका महिन्याच्या आतच ही दुसरी घटना आज घडली आहे यामुळे या भागात हळहळ व वन विभागा विरोधात संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
आज सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान
त्यानंतर या परिसरात वन विभागाच्या वतीने 11 पिंजरे लावले होते परंतु आजपर्यंत या पिंजऱ्यामध्ये कुठलाही बिबट्या जेरबंद झाला नाही तर हुशार वन विभागाने पहिल्या टप्प्यात पिंजरे लावल्यानंतर कुठलेही भक्ष पिंजऱ्यात ठेवले नसल्याची हास्यस्पद घटना घडली होती. जर बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात भक्ष ठेवले नसेल तर पिंजरा त्यामध्ये जाऊच कसा शकतो हे वन विभागाला कळत नाही का? असा सवाल आजही मांडवगण फराटा येथील नागरिक विचारत आहे.
मांडवगण फराटा येथे महिनाही झाला नसेल त्यावेळेस एका चिमुकल्याचा अशाच प्रकारे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. वन विभागाने याबाबत दखल न घेतल्याने व बिबट्या आजपर्यंत पकडला गेला नाही. नर-बक्षक बिबट्याने आज पुन्हा चिमुकली आता बळी घेतला ही
घटना अतिशय दुर्दैवी असून यामुळे नागरिकांचा संतापनावर झाला आहे. या भागात फिरणाऱ्यांना नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित या भागात पिंजरे लावावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. नागरिक मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
शंकरराव फराटे माजी संचालक घोडगंगा सहकारी साखर कारखाना.
वनविभाग बिबट्याचे हल्ले होत असताना याबाबत मात्र दक्ष नसल्याचे दिसून येत आहे. आणखी किती जणांचे बळी घेतल्यावर वन विभाग जागे होईल. ही घटना अतिशय दुःखदायक आहे.
बबन पाटोळे, स्थानिक नागरिक मांडवगण फराटा