शिरूर विधानसभेसाठी अशोक पवार नावाच्या आणखी दोन उमेदवारानी अर्ज भरल्याने संभ्रम

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार अशोक पवार यांच्या नावाची गफलत करण्यासाठी अशोक पवार नावाचे दोन उमेदवार दिल्याने या निवडणुकीत आमदार पवार यांना अडचणीत आणण्याची खेळी नक्की कोणाची विरोधक का? हितचिंतक यांची याबाबत मात्र चर्चांना उधाण आले आहे.
        राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार हे उमेदवार असून, उमेदवारीचा अर्ज भरताना अशोक रामचंद्र पवार व अशोक गणपत पवार असे अशोक पवार नावाची आणखी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आज तरी असून, यामुळे मतदारांची गफलत होण्याची शक्यता आहे. 
         उद्या होणाऱ्या छाननी मध्ये या दोघांच्या अर्ज असतील तर उमेदवारी अर्ज माघारी मध्ये या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही तर याचा काही प्रमाणात फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक रावसाहेब पवार यांना बसू शकतो. 
         अशोक पवार नावाचे आणखी दोन उमेदवार फक्त वडिलांचे नाव वेगळे आहेत. ही खेळी विरोधकांची असल्याचे बोलले जात असून अशोक पवार यांना अडचण करण्यासाठी असे उमेदवारी अर्ज दाखल केले असावेत याची शक्यता नाकारता येत नाही.
  
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!