शिरूर विधानसभा निवडणुक उमेदवारी अर्ज छाननी बिडगर ,आपटे ,कर्दळे या तिघांचे उमेदवारी अर्ज बाद

9 Star News
0
शिरूर प्रतिनीधी 
            शिरूर विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज छाननी मध्ये बिडगर,आपटे, कर्दळे या तीन उमेदवार उमेदवारांचे अर्ज बाद झाले आणखी तीन उमेदवारांची डमी अर्ज असे एकूण सहा उमेदवारी अर्ज बाद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी सांगितले असून, आता पंचवीस उमेदवारांची अर्ज राहिले आहेत.
       उमेदवारी अर्ज मागे घेण्याची चार नोव्हेंबर रोजी किती जण आपले उमेदवारी मागे घेतील यावरून
 शिरूर विधानसभा निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार. 
             शिरूर विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवारांनी ४२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
त्यापैकी वंचित बहुजन विकास आघाडीचे रामकृष्ण बिडगर, भारतीय धर्मनिरपेक्ष पक्षाच्या प्रिया कर्दळे, अपक्ष शत्रुघ्न आपटे या तीन जणांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहे.
          अशोक रावसाहेब पवार,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (महविकास आघाडी), ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष (महायुती),)भाऊसाहेब बाळासाहेब जाधव, समता पार्टी,शिवाजी कुऱ्हाडे, रासप, नाथाभाऊ पाचर्णे,बहुजन मुक्ती पार्टी, प्रदीप कंद, अपक्ष ( भाजप बंडखोर), शांताराम कटके,अपक्ष ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष,बंडखोर) तुकाराम डफळ सैनिक समता पार्टी , गणेश दाभाडे अपक्ष जरांगे पाटिल गट,पंढरीनाथ मल्हारी गोरडे, अपक्ष, सुजाता अशोक पवार, अपक्ष,प्रकाश सुखदेव जमदाडे,अपक्ष दत्तात्रय काळभोर,अपक्ष चंद्रशेखर घाडगे,,जगदीश पाचर्णे अपक्ष, सुरेश वाळके अपक्ष, संजय पाचंगे अपक्ष, मनीषा ज्ञानेश्वर कटके अपक्ष, अशोक रामचंद्र पवार अपक्ष अशोक गणपत पवार अपक्ष, शिवाची ज्ञानदेव कदम अपक्ष, विनोद वसंत चांदगुडे, मारुती बाबुराव वाघचौरे, राजेंद्र वाल्मीक कांचन विशाल शंकर सोनवणे 
हे उमेदवार आज निवडणुक रिंगणात असून ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतील यावर पुढील निवडणुक गणिते समोर येतील.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!