नागरगावात दरवाजाचे कुलूप तोडून ७० हजाराचे दागिने लांबवले
( प्रतिनिधी )नागरगाव ता. शिरुर येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोने चांदीचे दागिने किंमत सत्तर हजार ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत संजय पूनमचांद शेलार वय ४२ वर्षे रा. नागरगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे नागरगाव ता. शिरुर येथील संजय शेलार हे काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेले होते, दोन दिवसांनी संजय यांच्या घराचे कुलूप तुटले असल्याचे शेजारील महेंद्र शेलार यांना दिसल्याने त्यांनी संजय यांना फोन करुन माहिती दिली, त्यांनतर संजय हे घरी आले असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाट उघडे दिसले, दरम्यान त्यांनी कपाटाची पाहणी केली असता चोरट्यांनी सत्तर हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागीने चोरल्याचे दिसून आले, याबाबत संजय पूनमचांद शेलार वय ४२ वर्षे रा. नागरगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संपत खबाले हे करत आहे.
