शिरूर तालुक्यातील गुणाट येथे चौफुला चौकात
छोटा हत्ती टेम्पोतून कत्तली साठी घेऊन जाणाऱ्या दोन गाय व दोन कालवडींची शिरूर पोलिसांनी सुटका केली असून या प्रकरणी तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गाई व टेंपो असा तीन लाखाच ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
विशाल राजाराम बिटके (वय 28 वर्षे, रा. बिटकेवाडी, कोतवालवस्ती, ता. कर्जत, जि. अहमदनगर ) ,सलीम शेख (रा. दत्तवाडी, शिंदोंडी ता. शिरूर, जि. पुणे ) ,अतिक गुलाब हुसेन कुरेशी (रा. श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा, जि. पुणे) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
ओकांर बापु शिरोळे पोलीस शिपाई शिरूर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक चार सप्टेंबर रोजी रात्री सव्वा 11 वाजण्याच्या सुमारास गुनाट गावच्या हद्दीत चौफुला चौकात छोटा हत्ती (टेम्पो) क्र. एम. एच 16 सी.डी. 8793 या मधुन वरील तीन आरोपी यांनी टेम्पोमध्ये दोन गाय व दोन कालवडी अशी 4 जनावरे कुरपणे कोंबुन त्यांना कोणत्याही प्रकाचा चारापाणी व्यवस्था न करता तसेच जनावरांची वाहतुकी पुर्वी वैदयकीय तपासणी करणे बंधनकारक असताना जनावराची वैदयकीय तपासणी न करता वाहतुकीचा कोणताही परवाना, न घेता कत्तलीसाठी घेवुन जात असताना मिळुन आले आहेत. दोन गाय व दोन कालवडी ,एक छोटा हत्ती टेम्पो असा एकूण तीन लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. तर फिर्यादीवरून वरील तीनही आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागणुक 1960 क, 11 (1) ग,ड, ज, प्रमाणे, मो. वा. का. 1988 कलम 66,192 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे करीत आहे.