नवसाला पावणारा शिरूरचा राजा, अशीख्याती असलेल्या येथील सुभाष चौकातील आझाद हिंद गणेश मंडळाच्या मानाच्या गणपतीसाठी, यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त २१ किलो चांदीचे सिंहासन तयार केले असून प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल व दीना धारिवाल तसेच आदित्य धारिवाल, साक्षी धारिवाल यांनी विधीवत या सिंहासनाचे पूजन करून.सुभाष चौकातील मानाच्या गणपतीसाठी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने घडविलेले हे चांदीचे सिंहासन गुरुवारी विधीपूर्वक बाप्पांच्या चरणी अर्पण करण्यात आले.
शहरातील हे सर्वांत जुने मंडळ असून, मंडळाच्या ७७ व्या गणेशोत्सवानिमित्त यावर्षी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
मंत्रोव्यारात या सिंहासनावर सुभाष चौक गणपतीची प्रतिमा ठेवल्यानंतर मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला.
यावेळी उपस्थितांनी सिंहासनावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. माजी नगराध्यक्ष नेमीचंद फुलरुगर, माजी नगरसेविका पुष्पाबाई फुलफगर, माजी नगरसेवक संजय खांडरे, घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक धरमचंद फुलफगर, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष शरद कालेवार, अॅड. प्रमोद सागवेकर, अजय कोठारी, सराफ व्यवसाय शांतनू खांडरे,भरत कालेवार, सोमनाथ जगताप, अॅड. विलास खांडरे, दिलीप शेजवळ, जितेंद्र खांडरे,सचिन खामकर आदी यावेळी उपस्थित होते.
आझाद हिंद गणेश मंडळाचे फास वर्षांहून अधिक काळ यशस्वीरीत्या अध्यक्षपद भूषविणणारे शंकरसिंग परदेशी आणि त्यांच्या पत्नी विमलवाई परदेशी यांचा पावेळी प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. धारिवाल यांनी मंडळाच्या विविध उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
आझाद हिंद गणेश मंडळाच्या गणपतीला अर्पण केलेल्या चांदीच्या सिंहासनाची जडण-घडण इंद्रेश विश्वकर्मा, नितीन करडे, अॅड. प्रमोद सागवेकर यांनी केली आहे, खालील बाजूस चंदन आणि सागाचा पाट असून मागील बाजूस प्रभावळ, महिरप व दोन्ही बाजूस दोन हती आहेत. महिरपीवर सूर्य, चंद्र, ओम, कमळ, शंख ही शुभचिन्हे कोरलेली असून दोन्ही बाजूस सिंहआहेत.
१९४७ मध्ये त्या काळातील तरुणांनी मंडळाची स्थापना केली. देश स्वतंत्र नाव आझाद हिंद गणेश मंडळ, तर चौकाता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले. मंडळामार्फत अनेक विधायक उपक्रम राबविले असून, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रासाठीही मंडळामार्फत
योगदान दिले आहे. या सिंहासना करीता उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांचें मोठी मदत मिळाल्याने हे शक्य झाले.