सादलगाव येथील भीमानदीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला तर मांडवगण येथे ३७ वर्षीय पुरुषाने आत्महत्या केली

9 Star News
0

शिरूर प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील पूर्व भागात सादलगाव  गावच्या हद्दीत जुना कानगाव रोडवरील दिवेकर लिफ्ट जवळ भीमा नदीच्या काठावर ३० ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला तर मांडवगण फराटा येथे ३७ वर्षीय पुरुषांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे 

      याबाबत माणसिंग माणिक होळकर (वय ३८, रा. सादलगाव ता.शिरूर जि. पुणे ) यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे खबर दिली

      शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादलगाव (ता. शिरूर) गावच्या हद्दीत जुना कानगाव रोडवरील दिवेकर लिफ्ट जवळ भीमा नदीच्या काठावर माणसिंग माणिक होळकर (वय ३८, रा. सादलगाव, ता. शिरूर जि. पुणे ) हे बुधवारी (ता.०५) रोजी नदीकाठी मोटर चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना अनोळखी पुरूषाचा मृतदेह नदीकाठी पाण्यावर तरंगत असताना दिसून आला. याबाबत त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने अनोळखी पुरूषाला पाण्यातून बाहेर काढत शिरूर येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. वैद्यकीय अधिका-यांनी सदर अनोळखी व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नारायण गवळी करत आहे.

-------------------;-----------------------------------------------

मांडवगण फराटा येथे ३७ वर्षाच्या व्यक्ती गळफास घेवून आत्महत्या केली आहे .

. नवनाथ भरत केदारी (वय 37 वर्षे रा. गारमाळ, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे .           

     याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सावता भरत केदारी वय 40 वर्षे धंदा शेती रा. गणेगाव दुमाला, नांद्रे मळा, ता. शिरूर जि. पुणे यांनी यासंदर्भात खबर दिली आहे . हा प्रकार 03 संप्टेंबर 2024 रोजी दुपारी साडेतीन वा. चे सुमारास मांडवगण फराटा ता शिरूर येथे झाला. सावता केदारी यांना केडगाव येथे असताना त्यांचे वडील भरत दशरथं केदारी यांनी फोन करून सांगितले की, नवनाथ ने गळफास घेतला आहे त्यास मांडवगण फराटा येथे दवाखाण्यात आणले आहे तू लवकर ये असे सांगितले .त्यानंतर सावता हे मांडवगण फराटा येथे हॉस्पिटल मध्ये आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांचा भाऊ नवनाथ भरत केदारी क्य 37 वर्षे रा. गारमाळ, मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे यास तपासुन तो मयत झाले असल्याचे सांगितले . यासंदर्भात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खबाले करीत आहेत .

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!