शिरूर दिनांक ( प्रतिनीधी)
शिक्षकांनी सतत नव नवीन विषयांवर वाचले पाहिजे , शिकवले पाहिजे व संशोधन केले पाहीजे असे आवाहन माजी प्राचार्य आर एस .जैन यांनी केले .
शिक्षक दिनानिमित्त हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचा वतीने चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ .बाळकृष्ण लळित , व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचा प्राचार्या पसक्कीन कासी , विद्याधाम प्रशाला प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती साहेबराव मुळे , आरएमडी प्रशालेचा सुनिता संदिप बिहाणी , ओंकार संगीत विद्यालयाचे प्रमुख गणेश मराठे या शिक्षकांच्या प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह , शाल, व झाडाचे रोप असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी माजी प्राचार्य आर . एस जैन , प्रा .चंद्रकात धापटे , माजी मुख्याध्यापक व्ही. डी . कुलकर्णी , प्राचार्य डॉ . समीर ओंकार , हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद लांडे , माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड , अशोक काळे , अविनाश जाधव , सागर नरवडे , बांधकाम व्यवसायिक संदिप बिहाणी , प्राचार्य विनायक म्हसवडे , धनंजय नाईक आदी उपस्थित होते.
जैन म्हणाले की वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती घडविण्याचे ,पिढी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात शिक्षकांना प्रोत्साहन व प्रेरणा देणे आपली जबाबदारी आहे. मागील अनेक वर्षापासून समाजातील शिक्षकांना प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार हलवाई चौक गणेश मित्र मंडळ देत असल्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
प्रा . चंद्रकांत धापटे म्हणाले की शिरुर शहरात विविध विधायक उपक्रम राबविले जातात हीच परंपरा हलवाई चौक गणेश मित्र मंडळ पुढे चालवीत आहे.. शिक्षकामुळे नवीन पिढी घडत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षक कार्यरत असतात. समाजातील चांगल्या कामाच्या मागे सर्वांनी उभे राहिले पाहिजे. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सर्वच क्षेत्रात मोठ्या झपाट्याने बदल होत असून शिक्षक क्षेत्रात ही बदल होत आहे.
डॉ . लळित म्हणाले की शिक्षक आपल्या कृतीतून व संस्कारातून समाज घडवित असतो . समर्थ भारत घडविण्यात शिक्षकांची मोठी भूमिका आहे .शिक्षक हे विद्यार्थ्यातील गुण हेरून त्याचे व्यक्तिमत्व घडवीत असतात. समाजाची उभारणी शिक्षक करीत असतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सतीश धुमाळ यांनी केले त्यांनी सांगितले की सामाजिक व विधायक उपक्रमांचे आयोजन हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचा वतीने वर्षभर केले जात असते. काही वर्षापूर्वी गणेश विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने काढून त्या वाचलेल्या पैसातून मंडळाने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्याच बरोबर पर्यावरण संर्वधनसाठी वृक्षारोपण व झाडांचे वाटप, शालेय साहित्य वाटप, निराधारांना मदत, वाचन संस्कृती वाढीसाठी पुस्तकांचे वाटप असे विविध उपक्रम राबविले जातात.
प्राचार्य पसक्कीन कासी , गणेश मराठे , ज्योती मुळे , सुनीता बिहाणी , डॉ . समीर ओंकार यांनी ही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार अविनाश जाधव यांनी मानले.
फोटो ओळी
हलवाई चौक गणेश मित्र मंडळाचा वतीने शिक्षक दिनामिमित्त प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार देण्यात आले.