सावधान रोडरोमियांनो दामिनी पथक सतर्क झाले असून आढळल्यास होणार कडक कारवाई... तर अल्पवयीन वाहन चालकांना पाच हजार रुपये दंड तर त्यांच्या पालकांना दहा हजार रुपये दंड होणार - संदेश केंजळे पोलीस निरीक्षक

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       शिरूर शहरातील शाळा कॉलेज रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या रोड रोमीयांवर कारवाई करण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने दामिनी पथक गस्त सुरु झाली असून यावेळी आढळणाऱ्या रोडरोमींयावर कडक कारवाई करण्यात येणार असून, अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास पालकांवर दहा हजार रुपये दंड तर मुलावर पाच हजार रुपये दंड शासन निर्णयानुसार करण्यात येणार असल्याचा इशारा नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिला आहे.
           शिरूर पोलीस स्टेशन येथे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
            सध्या गणेशोत्सवचा काळ असून तरी ही कारवाई आजपासूनच सुरुवात केली आहे. गणेशोत्सव नंतर ही कारवाई आणखी कडक होणार असल्याची त्यांनी सांगितले. शहरातील अवैद धंदे यांच्यावर आळा बसवण्यासाठी उपयोजना सुरू आहेत.
      प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जाऊन शालेय विद्यार्थींनी गुड टच बॅड टच याबाबत दामिनी पथकाच्या माध्यमातून माहिती देऊन विद्यार्थिनींचे प्रबोधन करणार आहे. शहरातील कॅफेवर पोलीस लक्ष देऊन आहेत अश्लील वर्तन करू देणारे कॅफेंवर व कॅफे मालकावर कारवाई करण्यात येणार आहे. 
          शिरूर शहरात व शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच गावांमध्ये पोलीस गस्त वाढवण्यात येणार असून स्थानिक पातळीवर ग्राम सुरक्षा दल यंत्रणा कारवाई करण्यात येणार असल्याचे केंजळे यांनी सांगितले.
           शिरूर शहरात मी स्वतः संवेदनशील भागामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात रोड रोमिओ गुंड यांचा वावर असतो त्या ठिकाणी गस्त घालणारा असून या भागात आढळणाऱ्या रोड रोमिओ व गुंडांवर कडक कारवाईचा बडगा उगारणार... घातक हत्यारे घेऊन वावरणाऱ्या गुंडांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत अशा प्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. 
       शिरूर शहरात मंगळसूत्र चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात झाले आहेत याबाबत पोलिसांकडून तपास सुरू असून या घटना होऊ नये यासाठी पोलीस सतर्क आहेत तर शिरूर तालुक्यात रोहित्र चोरीची एक टोळी पकडली असून तरी या रोहित चोरीच्या घटना घडत आहेत . त्यामुळे आणखीन रोहित्र चोरीची टोळी सक्रिय आहे या दोन्ही घटनेबाबत पोलीस संवेदनशील आहेत याबाबत तपासही सुरू आहे असे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!