निर्वी शिरूर रस्त्यावर कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या पंचवीस गायच्या वासरांची शिरूर पोलिसांनी केली सुटका

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
          निर्वी ता. शिरूर येथे पिकप जीप मधून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या पंचवीस गायींच्या वासराची शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने सुटका केली असून, जीपसह वासरे असा ४ लाख २५ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे तर अज्ञात पीकप चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 
        पांडुरंग दत्तात्रय  बागुल पोलीस कॉन्स्टेबल  शिरूर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे. 
           पिकप जीप वरील अज्ञात चालका विरोधात रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे 8 सप्टेंबर रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान निर्वी शिरूर रोडवर पिक अप जिप नं एम एच 12 पी एफ 9813 वरील अज्ञात चालक याने त्याचे ताब्यातील पिकअप मध्ये 25 जनावरांची वासरे वाहतुकीचा परवाना नसताना ती वासरे क्रूरपणे दाटीवाटीने कोंबुन त्यांना कोणत्याही प्रकारचा चारापाणी व्यवस्था न करता तसेच जनावरांची वाहतुकीपुर्वी वैदयकीय तपासणी करणे बंधनकारक असताना, त्या जनावराची वैदयकीय तपासणी न करता घेवुन जात असताना समोर पोलीस गाडी पाहुन पिकअप गाडी सोडुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला आहे म्हणुन  पिकअप क्रं एम एच 12 पी एफ 9813 वरील अज्ञात चालकाचे विरूद्ध  प्राण्यांना क्रुरतेने वागविणे अधिनियम 1960 चे कलम 11(1), ग, ड,ज, मो.वा.का. कलम 66/192,134/177 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोरे करीत आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!