शिरूर शहरातील बी जे कॉर्नर परिसरात फिरणाऱ्या ४४ रोड रोमिओ व बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई तरी ४० हजाराचा दंड केला वसूल तर पोलिसांना ॲक्शन मोडवर पाहून अनेक रोडरोमिओची पळता भुई थोडी झाली....
आज रोजी शिरूर शहरांमध्ये शिरूर वाहतूक पोलिसांकडून सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, बी जे कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त/अल्पवयीन वाहन चालक यांच्या ४४ वाहनांवर कारवाई करत ४० हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे .
शिरूर शहरांमध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट नंबर, नंबर प्लेटवर नाव टाकणे, ट्रिपल सीट, विना लायसन, भरधाव वेगात मोटर सायकल चालवणे, बुलेट मोटरसायकलचे फटाके वाजवणे, काळ्या काचा असणाऱ्या फोर व्हीलर अशा वाहन चालकावर आज कारवाई करण्यात आली.
यापुढे ही कारवाई अजून तीव्र करणे करीता पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी रोड रोमियो पथक सक्रिय केले असुन.
सदरची कारवाई पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, पोलीस अंमलदार वीरेंद्र सुंबे, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गोरे, पोलीस अमलदार विक्की यादव, पोलीस अमलदार विनोद काळे यानी केली आहे.
अठरा वर्षांच्या खालील पाल्यांना मोटरसायकल चालवण्यास देऊ नये असे आढळल्यास पालकांवर गुन्हा किंवा मोठ्या रकमेचा दंड करण्याची कारवाई करण्यात येईल.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे