शिक्रापूर ता. शिरुर येथील पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर एका इमारतीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर शिक्रापूर पोलिसांनी इमारतीवर छापा टाकून छाप्यामध्ये तीन इसमांसह दोन महिला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, एकजण मारतीवरून उडी मारून पळून गेला असून, पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
दोन महिलांना ताब्यात घेतले असून,
पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या राधे श्याम वाळूंज (रा. पारनेर पारनेर जि. अहमदनग);, बाळासाहेब फक्कडराव पोतले रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे )व संकेत सुभाष शितोळे (रा. न्हावी सांडस ता. हवेली जि. पुणे) या दोघांवर गुन्हे दाखल केले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर पाबळ चौकातील स्टेटबँक ऑफ इंडिया समोर बाळासाहेब पोतले यांच्या बिल्डींगमध्ये काही इसम व महिला वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यांनतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस हवालदार विकास पाटील, उद्धव भालेराव, महिला पोलीस शिपाई उर्मिला पवार, शीतल गवळी यांनी सदर ठिकाणी जाऊन बनावट ग्राहक बिल्डींगमध्ये पाठवून तपासणी करत छापा टाकला असता एक इसम इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर उडी मारून पळून गेला मात्र पोलिसांनी दोघा इसमांसह दोन महिलांना जागेवर ताब्यात घेत, सदर बिल्डींग मध्ये त्यांच्याजवळ मिळून आलेले साहित्य व काही रोख रकमेसह त्यांना ताब्यात घेतले, याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तानाजी साळुंखे ( रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या राधे श्याम वाळूंज रा. पारनेर पारनेर जि. अहमदनगर, बाळासाहेब फक्कडराव पोतले रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे व संकेत सुभाष शितोळे रा. न्हावी सांडस ता. हवेली जि. पुणे यांच्या सह दोघा महिलेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करत आहे.