स्वराज्य रक्षक फाउंडेशन व यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित महिला दहीहंडी शिरूर येथील सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या मुलींनी दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक मिळवला व प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेता संघास माजी नगराध्यक्ष रवी उर्फ श्याम मनोहर ढोबळे यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचे २१ हजाराचे बक्षीस व स्मृतिदिन देऊन गौरवण्यात आले.
बोल बजरंग बली की जय.. एक दोन तीन चार थिटे कॉलेजच्या पोरी हुशार... दहीहंडी फोडतात झाला एकच जल्लोष...
स्वराज्य रक्षक फाउंडेशन यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने शिरूर तालुक्यात प्रथमच, महिला दहीहंडी स्पर्धा दोन वर्षा पासून घेण्यात येत आहेत.
या वर्षी ८ सप्टेंबर २०२४ रोजी रयत शाळेच्या मैदानावर या महिला दही हंडी चे आयोजिन करण्यात आले होते.
तसेच यावेळी शासन नियुक्त विकास समिती पुणे महानगरपालिका तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे शांताराम (बापू )कटके व महिला दक्षता कमिटी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या अर्चना शांताराम कटके यांच्या हस्ते विजेत्या संघांना करंडक व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांताराम (बापू )कटके , तालुका अध्यक्ष रवींद्र काळे, जिल्ह्याचे राजेंद्र कोरेकर ,अर्चनाताई कटके, प्राजक्ता ढोबळे, पूजा कंद, शोभना पाचंगे, राणी कर्डिले, आशा पाचांगे, पठाण भाभी, साधना शितोळे, किरण झांबरे, स्वाती थोरात, काजल थोरात, सुनीता डोंगरे, सुरेखा बोस, मनीषा वाळुंज , संदिप आव्हाळे कला क्रीडा, सामाजिक व राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधव तसेच याच बरोबर अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना शासन नियुक्त विकास समिती पुणे महानगरपालिका तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे शांताराम (बापू) कटके म्हणाले महिलांनी असे कार्यक्रम घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे व विशेष म्हणजे ही दही हंडी फक्त शिरूर तालुक्यातील शाळा व कॉलेज यांच्या प्रोसोनासाठी घेण्यात येत आहे व समाजातील अशाच भगिनी पुढे आल्या तर समाजात नक्कीच प्रगती होईल.या कार्यक्रमाच्या आयोजिका. यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या सचिव नम्रताताई गवारे व संपादिका शोभा परदेशी यांचे मान्यवरांनी महिला दहीहंडी भरवल्याबद्दल कौतुक केले
या महिला दही हंडी कार्यक्रमास रवि बापू काळे , संदिप आव्हाळे तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
तर या कार्यक्रमास अमृत झांबरे, विक्रम ठाकुर, संजय थोरात, रवि लेंडे, चैतन्य ताकिर, प्रथमेश पोळ, संदेश गवारे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका साधनाताई शितोळे व अमृत झांबरे यांनी केले. आभार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ चे प्रवक्ते दादासाहेब गवारे यांनी मानले