घोडगंगा सहकारी साखर कारखाना बोलतोय मी खरंच तुमच्या या पदयात्रेमुळे जिवंत होईल का ? मला ही जगायचं आहे.. माझा राजकीय बाजार मांडू नका... अन्यथा मी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल...

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       शिरूर तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी लढा स्वाभिमानाचा या नावाखाली शिरूर तालुक्यातून पायी पदयात्रा काढून नागरिकांची प्रबोधन करणारा असल्याचे सांगितले एक वर्षाने तरी विरोधक जागे झाले परंतु याचे फलित नक्की काय मिळणार हे कोणी सांगू शकत नाही हे मात्र खरे आहे. अहो तुमच्या या आंदोलनाने खरच मी पुन्हा जिवंत होईल का? मला पुन्हा चालुद्या... माझा राजकीय बाजार मांडू नका... अन्यथा मी उध्वस्त होईल....
अशी हाक स्वर्गीय रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना मारत आहे.
        शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काम धेनू म्हणून ओळख असणाऱ्या स्वर्गीय रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखाना दुसरा गळीत हंगाम ही बंद होऊन सलग दोन वर्ष हा कारखाना बंद आहे असेच म्हणावे लागेल. 
        परंतु विरोधकांनी ही घोडगंगा संघर्ष यात्रा पाच ते सहा महिने अगोदर काढायला हवी होती याबाबत केवळ गावागावात फिरून प्रबोधन होणार नाही. शासन पातळीवरही हा कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु विरोधकांकडूनही दुसरा हंगाम बंद होणारच आहे माहिती असले तरी कुठल्याही ठोस हालचाली झाल्या नाही. मग आताच का घोडगंगा संघर्ष यात्रा काढली. हा संशोधनाचा विषय आहे.
यामुळे तरी घोडगंगा कारखाना चालू होणार का ? केवळ हा फार्स आहे.
          घोडगंगा सुरू करायची तुमची इच्छाच आहे तर शासनही तुमचेच आहे या संघर्ष यात्रा मध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार, शिवसेना शिंदे हे तीनही पक्ष आहेत. तुम्हाला खरंच घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करायचा असेल तर आता राहिली दहा ते पंधरा दिवस राज्य शासनाकडून सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करून कारखाना प्रशासनाच्या हाती देऊन कारखाना सुरू होण्यासाठी चा निधी घेऊन कारखाना सुरू करा अशी मागणी करणे गरजेचे आहे. 
        संघर्ष यात्रा काढून केवळ याला गाढ त्याला गाढ याशिवाय काहीच होणार नाही. यातून कारखाना कधीच सुरू होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे.
        बंद पडलेला कारखाना आपले शेजारीच आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघांमध्येच आहे. सर्व पक्षाची शासन येऊन गेली परंतु तो यशवंत जो बंद पडला तो पुन्हा पुनर्जीवीत झाला नाही. हे सगळ्यांना ज्ञात आहे. आणि हवेलीतीलच दोन बडे नेते मोठ्या थाटात घोडगंगा सुरू होण्यासाठी या आंदोलनात सहभागी होतात हे हास्यास्पद नाही का.
         खरंच हा कारखाना तुमच्या रोजी रोटीत असेल आणि तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील पंधरा दिवस राहिले आहेत राज्य शासन जायला नवीन विधानसभेच्या निवडणुका यायला या पंधरा दिवसाच्या आत कारखाना सुरू करण्यासाठी तुम्हाला जे करता येईल ते करू शकता त्यात तुमचा प्रयत्नांना यशही येऊ शकते. हे केले तरच घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा जीवित होऊ शकतो. 
        अन्यथा किती यात्रा किती संघर्ष केला तर त्यातून कारखाना नव्याने सुरू होऊ शकणार नाही. त्यासाठी राज्य शासनाकडे तोच प्रयत्न करावे लागेल. 
         ज्या पद्धतीने घोडगंगा सहकारी साखर कारखाने ची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली त्यावरून असे वाटते की सत्ताधाऱ्यांना कारखाना सुरू करायचा नाही आणि विरोधकांना तो सुरू करू द्यायचा नाही हेच या सर्वसाधारण सभेतून दिसले आहे. 
        हा विधानसभा निवडणुकीसाठीचा सुरू असलेला स्टंटही असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
          ही सभा कारखाना गाजली पाहिजे होती त्यासाठी संघर्ष हवा होता आणि वेळ पडली तर सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून हा कारखाना आपण सुरू करू याला पुनर्जीवित करू यासाठी राज्य किंवा केंद्र शासनाकडे जायला लागले तरी हरकत नाही त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शासनाकडे हवा असलेला निधी मागून घेऊ असे म्हणणे गरजेचे होते परंतु प्रत्येकानी आपापली पोळी आणि त्याच तिकीटावर त्योच खेळला आणि सभा गोंधळात पार पडली मरणा वस्तीत असलेला आमचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना मात्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या उणे धुणे यांची धोपाटी खाऊन शेवटचा घटका मोजत आहे हे मात्र नक्की खरे आहे असेच म्हणावे लागेल.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!