घडलेल्या प्रकाराबाबत दिपाली अमर साळुंखे (वय २४ वर्षे रा. भांबर्डे रोड रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. शुक्रवार पेठ जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी रोमन, ओम, डिग्या लोखंडे व सोबत इतर तीन ते चार त्यांचे मित्र सर्व पूर्ण नाव माहिती नाही (रा.रांजणगांव गणपती ता. शिरुर जि.पुणे) यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीप्रमाणे रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील भांबर्डे रोड लगत राहणाऱ्या अमर साळुंखे यांचे रोमन नावाच्या व्यक्तीसोबत पैशाच्या व्यवहारातून वाद झाले असताना रोमन सह त्याचे काही साथीदार अमर साळुंखे यांच्या घरी येऊन शिवीगाळ., दमदाटी करु लागल्याने अमर यांच्या पत्नीने त्यांना जाब विचारला असता आलेल्या सर्व युवकांनी सदर महिलेला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत धमकी दिली, घडलेल्या प्रकाराबाबत दिपाली अमर साळुंखे( वय २४ वर्षे रा. भांबर्डे रोड रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. शुक्रवार पेठ जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे )यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रोमन, ओम, डिग्या लोखंडे ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांसह तीन अनोळखी युवक सर्व रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिरुर उपविभागीय पोलीसअधिकारी प्रशांत ढोले हे करत आहे.