गणेश विसर्जन काळात नगर परिषदेच्या वतीने सर्व सोयी सुविधाने सज्ज तर मूर्तिदान करणाऱ्या गणेश मंडळ व नागरिकांना पर्यावरण दूत पुरस्काराने गौरवणार मुख्याधिकारी स्मिता काळे

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
     येणाऱ्या गणेशोत्सव मध्ये गणेश विसर्जन करिता शिरूर नगरपरिषद सज्ज झाली असून नगर परिषदेच्या वतीने शनिमंदिर विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट , रयत शाळेचे मैदानावरील कृत्रिम विसर्जन कुंभ या तीन ठिकाणी उभारण्यात आले आहेत सर्व सोयीनियुक्त विसर्जन घाट व उपाययोजना करण्यात आले असल्याची माहिती शिरूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली. गणेश मूर्ती दान करणाऱ्या गणेश मंडळ व नागरिकांना पर्यावरण दूत पुरस्काराने गौरवण्यात येणार.
      गणेश उत्सव व विसर्जन मिरवणूक व विसर्जन घाट याबाबत नागरिकांच्या सूचना व नगरपरिषदेने केलेल्या कामाबाबत माहिती देण्यासाठी गणेश मंडळ व नागरिक यांची नगर परिषदेच्या वतीने बैठक बोलवण्यात आली होती.
      शहरातील मिरवणूक रस्त्याची पाहणी करुन रस्त्याची दुरुस्ती खड्डे भरणे व स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून गणपती विसर्जन घाटावर स्ट्रीट लाईटची ही व्यवस्था केलेली असून मिरवणूक मार्गावरील राडाराडा उचलण्यासाठी संबंधित नागरिकांना तोंडी व लेखी सूचना देण्यात आले आहे.
यंदाचे वर्षी गणेश मुर्ती विसर्जन करणे कामी शनिमंदिर विसर्जन घाट, दशक्रिया विधी घाट ,रयत शाळेचे मैदानावरील कृत्रिम विसर्जन कुंभ या तीन ठिकाणी गणेश मुर्तीचे विसर्जन करणे करीता सोय करण्यात आलेली आहे. गणपती विसर्जनासाठी येणा-या गणेश भक्तांना गणेश मुर्ती विसर्जन कुंभामध्ये विसर्जित करण्यास व सोबत आणलेले निर्माल्य नदीमध्ये न टाकता त्यासाठी कुंभाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामध्ये टाकावे असे आवाहनही मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले आहे.
        पर्यावरण अनुकुल गणपती विर्सजन होणेसाठी व इतर सर्व कामासाठी नगरपरिषदे मार्फत टिमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नगरपरिषदेव्दारे विविध माध्यामाव्दारे मुर्तीदान करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. विसर्जन स्थळी मुर्तीदान कक्षाची स्थापना करण्यात आले आहे. जे नागरिक मुर्तीदान करणार आहेत त्या नागरिकांना परिषदे मार्फत पर्यावरणदुत पुरस्काचे वाटप करण्यात येणार आहे.
      विसर्जन स्थळी नगरपरिषदे मार्फत नदीच्या किनारी बॅरिकेटची करण्यात आलेली आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागास तत्पर कार्यवाही साठी सज्ज राहण्याचे आदेशित देण्यात आले आहे. तर नदीवर गणेश गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेशभक्त गणेश मंडळ व नागरिकांनी लहान मुले नदीकडे जाऊ नयेत याची खबरदारी घ्यावी. तर नगर परिषदेचे वतीने कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून पट्टीचे पोहणारे जीवरक्षक या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
    नगरपरिषद सर्व बाबींवर यथोचित कार्यवाही करणार असून गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी नगर परिषदेच्या वतीने खबरदारी घेतलेली आहे. शिरुर शहरातील जास्तीत जास्त नागरिक गणेश मंडळांनी नगरपरिषदेने गणपती बाप्पांचे विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव किंवा कुंभामध्ये विसर्जन करावे व निर्माल्य नदीमध्ये टाकू नये. तसेच शहरातील भाविक भक्तांनी नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
            स्मिता काळे मुख्याधिकारी शिरूर नगरपरिषद
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!