शिरूर बस स्थानक येथे एस टी बस मध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलेचे २ लाख १२ हजार रुपयाची सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.
याबाबत प्रतिभा अमोल नांदवडेकर (वय ३१, रा रूम नं ३०२ महालक्ष्मी अपार्टमेंट विनायक नगर मोरेगाव नालासेपारा मुंबई ) यांनी फिर्याद दिली आहे.
अज्ञात चोरट्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शिरूर ता शिरूर जि पुणे गावचे हद्दीत शिरूर बस स्थानक येथे शिरूर ते पुणे जाणारे बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने मुद्दाम लबाडीच्या इरादयाने स्वताचे फायदयाकरिता फिर्यादीचे २ लाख १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करून गेले आहे म्हणुन त्या अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उबाळे करीत आहे.