शिरुर, दिनांक प्रतिनीधी
शिरूर शहरातील इस्लामपूर येथे गोमांस विक्री करणाऱ्या चार दुकानांवर शिरूर पोलिसांनी छापा टाकून २९२ गोमांस जप्त केले असून चार जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
याबाबत निखील भिमाजी रावडे (पोलीस कॉन्स्टेबल शिरूर पोलीस स्टेशन), यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शौकत इस्माईल कुरेशी (वय42वर्ष रा),हनिफ युसुफ शेख (वय65)इसराल इक्बाल कुरेशी(वय39 ) मुजीफ जलील कुरेशी (सर्वरा.ईस्लामपुरा, हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ शिरूर ता शिरूर जि पुणे.)यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २२ सप्टेंबर रोजी साडेबारा ते दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान शिरूर इस्लामपुरा येथील हजरत गौसुल आजम दस्तगीर दर्गाजवळ आरोपी त्यांचे दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गोमांस विक्री करित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी असणाऱ्या चार दुकानावर छापा टाकला असता त्यांना शौकत याच्या दुकानात ५६ कीलो गोमांस, हनिफकडे ४८ किलो गोमांस, इसरालकडे ६३ किलो गोमांस, मुजिफ दुकानात १२५ गोमांस हे त्यांचे दुकानांमध्ये विक्री करीता ठेवले असल्याचे आढळून आले हे सर्व गोमांस एकुण २९२ किलो ग्रॅम वजनाने ३५ हजार ४० रूपये किंमतीचे विक्री करीत असताना मिळुन आले आहे. पोलिसांनी ते जप्त केले आहे तर मुजीफ जलील कुरेशी हा सदर ठिकाणहुन पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला आहे. फिर्यादीवरून वरील ४ आरोपी विरूद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(क), ९(अ) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली असून , पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचें मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक हनुमंत गिरी करीत आहे.