पुणे जिल्ह्यात एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्रे
जुन्नर विधानसभा मतदासंघात ३५६ मतदान केंद्रे आणि १ लाख ६३ हजार २२४ पुरुष, महिला १ लाख ५७ हजार २४२ तसेच तृतीयपंथीय ४ असे एकूण ३ लाख २० हजार ४७० मतदार आहेत. आंबेगाव मतदार संघात ३४१ मतदान केंद्र असून पुरुष मतदार १ लाख ५७ हजार ४९४, महिला १ लाख ५१ हजार ७०३ आणि तृतीयपंथीय ९ असे एकूण ३ लाख ९ हजार २०६ मतदार आहेत.
खेड आळंदी मतदार संघात ३८९ मतदान केंद्र, पुरुष मतदार १ लाख ८९ हजार ४४४, महिला १ लाख ७७ हजार ४१७ आणि तृतीयपंथीय १२ असे एकूण ३ लाख ६६ हजार ८७३ मतदार आहेत. शिरूर मतदार संघात ४५७ मतदार केंद्र, पुरुष २ लाख ३७ हजार १९७, महिला २ लाख १८ हजार ३२० आणि तृतीयपंथीय २३ असे एकूण ४ लाख ५५ हजार ५४० मतदार आहेत.
दौंड मतदार संघात ३१० मतदान केंद्र, पुरुष संख्या १ लाख ६१ हजार २५१, महिला १ लाख ५१ हजार ८४७ आणि तृतीयपंथीय १२ असे एकूण ३ लाख १३ हजार ११० मतदार,
इंदापूर मतदार संघात ३३७ मतदान केंद्र असून १ लाख ७१ हजार ४२१ पुरुष, १ लाख ६१ हजार ५९६ महिला आणि तृतीयपंथीय १३ असे ३ लाख ३३ हजार ३० मतदार आहेत.
बारामती मतदार संघात ३८६ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ९० हजार ८४१, महिला १ लाख ८४ हजार २९० आणि तृतीयपंथीय २१ असे ३ लाख ७५ हजार १५२ मतदार आहेत.
पुरंदर मतदार संघात ४१३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख ३५ हजार २६१, महिला २ लाख १६ हजार ५०७ आणि तृतीयपंथीय ३२ असे ४ लाख ५१ हजार ८०० मतदार आहेत.
भोर मतदार संघात ५६४ मतदान केंद्र, पुरुष २ लाख २३ हजार ३५६, महिला १ लाख ९८ हजार १९१ आणि तृतीयपंथीय ६ असे ४ लाख २१ हजार ५५३ मतदार आहेत.
मावळ मतदार संघात ४०२ मतदान केंद्र, पुरुष १ लाख ९४ हजार २१५, महिला १ लाख ८४ हजार ६१६ आणि तृतीयपंथीय १३ असे ३ लाख ७८ हजार ८४४ मतदार आहेत.
चिंचवड मतदार संघात ५६१ मतदान केंद्र, ३ लाख ३९ हजार ७२७ पुरुष, ३ लाख ३ हजार ९८९ महिला आणि तृतीयपंथीय ५३ असे ६ लाख ४३ हजार ७६९ मतदार आहेत.
पिंपरी (अ.जा.) मतदार संघात ३९८ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख ७९२, महिला १ लाख ८३ हजार १२ आणि तृतीयपंथीय ३० असे ३ लाख ८३ हजार ८३४ मतदार आहेत.
भोसरी मतदार संघात ४८३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख १८ हजार ५७८, महिला २ लाख ६८ हजार २२० आणि तृतीयपंथीय ९७ असे ५ लाख ८६ हजार ८९५ मतदार आहेत.
वडगांव शेरी मतदार संघात ४३७ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख ५३ हजार ११६, महिला २ लाख ३६ हजार २७६ आणि तृतीयपंथीय १०२ असे एकूण ४ लाख ८९ हजार ४९४ मतदार आहेत.
शिवाजीनगर २८० मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ४६ हजार १२९, महिला १ लाख ४३ हजार ५८७ आणि तृतीयपंथीय ४६ असे २ लाख ८९ हजार ७६२ मतदार,
कोथरूड मतदार संघात- ३८७ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख २५ हजार ५०, महिला २ लाख ६ हजार ५७८ आणि तृतीयपंथीय २३ असे ४ लाख ३१ हजार ६५१ मतदार आहेत.
खडकवासला मतदार संघात ५०५ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख ९७ हजार २०३, महिला २ लाख ६४ हजार ७१२ आणि तृतीयपंथीय ४० असे ५ लाख ६१ हजार ९५५ मतदार,
पर्वती मतदार संघात ३४४ मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ८० हजार २२, महिला १ लाख ७३ हजार ९४५ आणि तृतीयपंथीय ९५ असे एकूण ३ लाख ५४ हजार ६२ मतदार आहेत.
हडपसर मतदार संघात ५२५ मतदार केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख २० हजार २६०, महिला २ लाख ८७ हजार ८४२ आणि तृतीयपंथीय ७२ असे ६ लाख ८ हजार १७४ मतदार आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) मतदार संघात २७४ मतदान केंद्रे असून यात १ लाख ४७ हजार ४९५ पुरुष, १ लाख ४३ हजार १६९ महिला आणि ३४ तृतीयपंथीय असे २ लाख ९० हजार ६९८ मतदार आहेत.
कसबा पेठ मतदार संघात २६८ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ३८ हजार ९९२, महिला १ लाख ४२ हजार २७१ आणि तृतीयपंथीय ३७ असे २ लाख ८१ हजार ३०० मतदार आहेत.