कान्हुर मेसाईचा डोंगर देशी झाडांनी नटणारवॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टकडून डोंगरवर बियांचे रोपणशिरूर

9 Star News
0
कान्हुर मेसाईचा डोंगर देशी झाडांनी नटणार
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टकडून डोंगरवर बियांचे रोपण
शिरूर 
( प्रतिनिधी ) कान्हुर मेसाई ता. शिरुर येथील गारकोलवाडी येथील माळरान डोंगरावर नुकतेच वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून जलसंसाधनचा विकास व व्यवथापन प्रकल्पाच्या उपक्रमांतर्गत देशी झाडांच्या बियांचे रोपण करण्यात आले असल्याने येथीलडोंगर देशी झाडांनी नटणार आहे.
                        कान्हुर मेसाई ता. शिरुर येथील गारकोलवाडी येथील माळरान डोंगराची नुकतेच मृद व जलसंधारण, शेती विकास, महिला विकास, उपजीविका आधारित उपक्रम राबवणाऱ्या वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून डच बँक च्या अर्थसहयातून जलसंसाधनचा विकास व व्यवथापन प्रकल्पाच्या अंतर्गत निवड करण्यात आली असून त्यामाध्यमातून जल संधारण, सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम करणे, जुने बंधारे दुरुस्ती करणे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, नाला खोलीकरण, जाळी बंधारे, कोरवाल बंधारे व लाभार्थी गटाची स्थापना करणे, सूक्ष्म व तुषार पद्धतीचा अवलंब करणे यांसह शेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे यांसत्खे उपक्रम राबवण्यात येणार आहे, तर नुकतेच येथील डोंगरावर उपस्थितांच्या माध्यमातून सिताफळ, चिंच यांसह आदी देशी झाडांच्या बियांची लागवड करण्यात आली, दरम्यान उपस्थितांचा माजी सरपंच अनिल शिंदे, समाजसेवक शहाजी दळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी वॉटर संस्थेचे संस्थेचे अधिकारी संदिप गायकवाड व प्रकल्प प्रमुख उत्तम दुबे आणि बस बॅक टिमचे अशिशकुमार साहो यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
फोटो खालील ओळ - कान्हुर मेसाई ता. शिरुर येथील गारकोलवाडी डोंगरावर बियांचे रोपण करताना पदाधिकारी.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!