शिरूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

9 Star News
0

शिरुर दिनांक ( वार्ताहर ) 
      ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिन शिरुर शहर आणि परिसरात मोठ्या उत्सहाने साजरा करण्यात आला . 'भारत माता कि जय ' , 'वंदे मातरम' च्या जयघोष यावेळी करण्यात आला . ध्वजरोहणाचा मुख्य शासकिय सोहळा शिरुर तहसिल कार्यालयाचा आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

       शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी ध्व्जारोहन केले .यावेळी आमदार ॲड .अशोक पवार , पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे , गटविकास आधिकारी महेश डोके , निवासी नायब तहसिलदार स्नेहा गिरगोसावी , महसूल नायब तहसिलदार प्रकाश मुसळे , संजय गांधी नायब तहसिलदार सुवर्णा खरमाटे , निवडणूक नायब तहसिलदार सुजाता गायकवाड बाराथे , भूमी अभिलेख आधिकारी अमोल भोसले यांच्यासह विविध शासकिय कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते .
     यावेळी देशभक्तिपर समूहगीत सादर करण्यात आली . 
       पंचायत समिती कार्यालयात गटविकास आधिकारी महेश डोके यांच्या हस्ते झेंडावंदन झाले . लोकजागृती चळवळीच्या वतीने शहरातील हुतात्मा स्मारकावर किसनराव विठोबा जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले .
       शिरुर नगरपरिषद येथे मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले . यावेळी पालिकेचे विविध विभागांचे विभागप्रमुख, शिरुर नगरपरिषद शाळांचे मुख्याध्यापक आदी उपस्थित होते .
       शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या हस्ते ध्वजारोहणझाले 
       शिरुर नगरपरिषद शाळा क्रमांक -४ व ६ याठिकाणी शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळ प्रशासनधिकारी पद्मावती शेषराव दिंडे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले .
         शिरूर नगर परिषद शाळा क्रमांक पाच येथे शिरूर शहर वकील सेलचे अध्यक्ष ॲड.रवींद्र खांडरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले
. शिरुर येथील जामा मशिद आवारात हाजी सिंकदर जहागिरदार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . 
         आयेशा बेगम उर्दू शाळा येथे शिक्षिका प्रतिभा आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . हलवाई चौक गणेश मित्र मंडळ येथे माजी नगरसेवक कै . बाबूशेठ चोपडा यांच्या पत्नी श्रीमती सुरेखा चोपडा यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले . 
           डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर येथे कारगील युध्दात सहभागी असलेले माजी सैनिक महादेव घावटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
           ज्ञानगंगा विश्वविद्यालय बाबूराव नगर येथे प्रसिध्द व्यवसायिक धन्यकुमार दरडा यांच्या हस्ते तर ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल येथे ॲड धर्मेंद्र खांडरे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले .
            जीवन विकास मंदिर शाळेत मुख्याध्यापक दिलिप शिंदे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले .
         चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक व प्रसिध्द सराफ धरमचंद फुलफगर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . यावेळी सचिव नंदकुमार निकम , प्राचार्य डॉ . . के .सी मोहिते आदी यावेळी उपस्थित होते .
         विद्याधाम प्रशाला येथे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य राजेंद्र भटेवरा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. . 
         न्यु इंग्लिश स्कूल रयत शाळा येथे माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .
           शिरुर नगरपरिषद उर्दु शाळेत शिक्षण मंडळाचे माजी सभापती नीलेश खाबिया यांच्या हस्ते झेंडावंदन झाले . 
       शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधे सचिव अनिल ढोकले यांच्या हस्ते ध्वजावंदन झाले.
           व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे मध्ये सिध्देश्वर वनीकरण समितीचे तुषार वेताळ यांच्या हस्ते झेंडावंदन झाले .
      सिताबाई थिटे फार्मसी महाविद्यालयात शिवदुर्गप्रेमी माजी सरपंच गणपतराव काळकुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले .  
         शिरुर शहर भाजपाचा वतीने लाटेआळी येथे ध्वजारोहन करण्यात आले .   
       स्वातंत्र्यदिनानिमित्त लाटेआळीतील भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौकात शालेय विद्यार्थ्यांच्या करीता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
       शिरूर नगर परिषदेच्या वतीने शिरूर शहरातील नगरपरिषद शाळा अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!