शिरूर प्रतिनीधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तर जयंती निमित्त ब्युटी पार्लर प्रशिक्षण घेतलेले महिलांना प्रमाणपत्र वाटप कऱण्यात आले.
आज रामलिंग येथील मंगलकार्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून , शिरूर ग्रामीण ग्रा.पंचायत व रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पार्लर प्रशिक्षण चे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच भरत बोऱ्हाडे, उपसरपंच - यशवंत कर्डिले,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष तुषार दसगुडे , वी. वी.कार्यकारी सोसायटी संचालक शरद पवार, ग्रामपंचायत सदस्य यशोधा दसगुडे इतर महिला मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिरूर ग्रामीण चे उपसरपंच - बाबाजी अण्णा वरपे मनोगत व्यक्त करताना बोलत होते,
महिलांनी स्वतःचा व्यवसाय स्वतः चालू करून स्वावलंबी व्हावे, तुम्हाला ज्या प्रशिक्षणाची गरज आहे ते ग्रामपंचायत मार्फत देव्यात येईल.
बाबाजी वरपे उपसरपंच शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत
महिलांना सक्षम करण्यासाठी जो निधी लागणार तो निधी कमी पडून देणार नसून,पार्लर प्रशिक्षण घेतल्यानंतर अनेक महिलांनी स्वतःचे घरगुती पार्लर चालू केले आहे,कोणताही व्यवसाय असो त्याची सुरवात छोट्या पासून होते .अनेक महिलांनी प्रशिक्षण घेतल्यामुळे फायदे झाले.
शिल्पा गायकवाड सरपंच, शिरूर ग्रामीण
महिलांनो कोणताही व्यवसाय असो तो कमी न समजता तो जीव ओतून करावा,तो व्यवसाय मोठा झाल्याशिवाय रहात नाही.कोणतीही सुरवात ही शून्यातून होते.
राणी कर्डिले,अध्यक्षा रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था शिरूर