शिरूर दिनांक २६ प्रतिनीधी
शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्ग दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे.
शिरुर तालुक्यातील दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर शुक्रवार शुक्रवार दिनांक ६ ऑगस्ट २४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता छत्रपती संभाजी सभागृह पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रशासकीय कारणास्तव सदरचा
महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबीर हे दिनांक २ ऑगस्ट आयोजित करण्यात आले होते परंतु प्रशासकीय कारणास्तव हे शिबिर घेण्यात आले आहे.
महसूल सप्ताह-२०२४ अन्वये एक हात मदतीचा-दिव्यांगांच्या कल्याणाचा सह पंचायत समिती शिरुर येथील छत्रपती संभाजी सभागृह येथे घेणेचे निश्चित करणेत आलेले आहे.
सदर शिबीरामध्ये दिव्यांगांना सेतू सुविधा केंद्रातून दिले जाणारे सर्व आवश्यक दाखले, संजय गांधी योजनेचा लाभ, आरोग्य तपासणी, यु डी आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन, पंचायत समिती मार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजना यांचा लाभ देणेत येणार आहे. तरी सदर शिबीराचे शिरुर तालुक्यातील सर्व दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन हि तहसीलदार म्हस्के यांनी केले आहे.