शिरूर, प्रतिनिधी
न्हावरे (ता. शिरूर) येथे दोन दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.
ही घटना रविवारी (ता. ३०) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रकाश संपत शेलार (वय ३७ रा.निर्वी, ता. शिरूर) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी बंडू बापूराव शेलार (रा. निर्वी ता. शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मच्छिंद्र गोविंद माळी (वय अंदाजे ४०, मूळ रा. पिंपरखेड, ता. नांदगाव, जि. नाशिक) या दुचाकीस्वाराच्या विरोधात अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बंडू शेलार यांचा पुतण्या प्रकाश न्हावरे येथून त्याच्या दुचाकीवरून (एम एच -१२ -डी क्यू ९९६०) निर्वीकडे जात होता. यावेळी प्रकाश हा ड्रीम फिटनेस क्लबजवळ गेल्यानंतर निर्वी बाजूकडून येणाऱ्या (दुचाकी एम एच १७ के एच ३०८१) दुचाकीवरील मच्छिंद्र याने प्रकाश याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. मच्छिंद्र याने निष्काळजीपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या येणाऱ्यास धडक दिली. यात प्रकाश हे गंभीर जखमी मृत्युमुखी पडले.