शिरूर
( प्रतिनिधी ) इनामगाव ता. शिरुर येथील शिवनगर येथे जागा वाटपासाठी चक्क जन्मदात्या आई वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सतीश बापूराव मचाले, छाया सतीश मचाले, ऐश्वर्या सतीश मचाले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इनामगाव ता. शिरुर येथील बापूराव मचाले हे घरात असताना त्यांचा मुलगा व सुनेने त्यांना जमीन आमच्या नावावर करुन द्या असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी बापूराव यांची पत्नी ठकूबाई मध्ये आली असता त्यांना देखील मुलगा, सून व नातीने मारहाण केली, याबाबत ठकुबाई बापूराव मचाले वय ७५ वर्षे रा. इनामगाव शिवनगर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सतीश बापूराव मचाले, छाया सतीश मचाले, ऐश्वर्या सतीश मचाले तिघे रा. रा. इनामगाव शिवनगर ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गवळी हे करत आहे.