शिरूर,( प्रतिनिधी )
शिक्रापूर ता. शिरुर येथील वेळ नदीच्या कडेला असेलल्या विहिरीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील वेळ नदीच्या कडेला असेलल्या पाठबंधारे विभागाच्या विहिरीकडे काही इसम गेलेले असता त्यांना विहिरीमध्ये एका इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसले, घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी घटनास्थळी धाव घेत आपदा मित्र वैभव निकाळजे, शुभम वाघ, बबन शिर्के, लाल मोरे यांसह आदींच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला मात्र त्या इसामाबाबत कहीही माहिती मिळू शकली नाही तर इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे, थोडा टक्कल पडलेला, अंगात पांढऱ्या रंगाचा टीपके असलेला शर्ट व काळी प्यांट, उजव्या हातावर T अक्षर गोंधलेले असे वर्णन असून याबाबत सिकंदर इस्माईल शेख वय ४२ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर इसामाबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे विहिरीतील मृतदेह बाहेर काढताना पोलीस व आदी तसेच नागरिकांची झालेली गर्दी.