शिरूर दिनांक
महाराष्ट्र कॅडेट फोर्स माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार विविध शालेय खेळांचे धडे यातून आपल्या भागातील मुले राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळली जातील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र कॅंडेट फोर्सचे डायरेक्टर महेश चासकर यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष 2024- 2025 च्या ट्रेनिंग ला 1 जुलै पासून सुरवात होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र कॅडेट फोर्स च्या माध्यमातून मिलिटरी कॅडेट पॅटर्न अंतर्गत सुरु झालेल्या प्रशिक्षणाला स्कुल्स , विद्यार्थी आणी पालकांची प्रचंड पसंती मिळाल्याची माहिती फोर्स चे डायरेक्टर महेश चासकर यांनी दिली
फोर्स च्या माध्यमातून शालेय क्रीडा प्रकारातील रायफल शूटिंग , पिस्टल शूटिंग , अर्चरी , मल्लखांब , जिम्नेस्टिक , मर्दानी खेळ (लाठी काठी , दांड पट्टा , ढाल - तलवार) , योगा , मार्शल आर्टस् , आर्मी परेड , रायफल ड्रिल या इव्हेंटचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महाराष्ट्र कॅडेट फोर्स मध्येवर्ष 2023-24 या कालावधीत 2000 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे आणी 2024 -25 या प्रशिक्षण काळात 2500+ विध्यार्थ्यांचा समावेश असेल अशी माहिती फोर्स चे टीम लीडर समीर कोंडे यांनी दिली
शालेय गेम्स मध्ये पण विद्यार्थी फोर्स च्या माध्यमातून राष्ट्रीय पातळी वर जावे या साठी शालेय गेम्स मध्ये सहभागी असणाऱ्या खेळांचा समावेश ट्रेनिंग मध्ये होणार असल्याची माहिती फोर्स चे इन्स्ट्रक्टर राष्ट्रीय खेळाडू सुरेश राऊत सर आणी शत्रुघ्न जरे सर यांनी दिली*
फ़ोर्स च्या वतीने गीतारामजी म्हस्के (पारनेर), आनंद कटारिया (केडगाव) , सुनील लोटके (आरणगाव), गायकवाड मॅम (वाळुंज), जयसिंग लंके (वडझिरे) , विलास साठे (जवळे), पासक्वीन मॅम (शिरूर) , कीर्ती मॅम (सोनई), जाधव सर(सोनई) , खोसे सर (निघोज) यांचे विशेष आभार व्यक्त केले
