शिरूर
( प्रतिनिधी ) शिरूर शहर,शिक्रापूर परिसरातील तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भिमा, सणसवाडी, पाबळ यांसह आदी गावांमध्ये बकरी ईद निमित्त सामुहिक नमाज पठन करत एकमेकांना शुभेच्छा देत मुस्लिम धर्मियांचा त्याग आणि समर्पणाचे प्रतीक असलेली बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
शिरूर शहर शिक्रापूर परिसरातील तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भिमा, सणसवाडी, पाबळ यांसह आदी गावांमध्ये मशीदमध्ये तर कांही ठिकाणी ईदगाहवर मुस्लिम बांधवांच्या बाजरी ईद निमित्ताने नेमणूक असलेल्या मौलानाच्या नेतृत्वाखाली सामुहिक नमाज पठन करण्यात आले,
शिरुर शहर आणि परिसरात मोठ्या उत्सहात बकरी ईद उत्सहात साजरी करण्यात आली . बकरी ईद निमित्त शहरातील बाजार मशिद ,जामा मशिद , मदिना मशिद , बक्करकसाई मशिद , क्कार्टर गेट मशिद या ठिकाणी नमाज अदा करण्यात आली . अनेक ठिकाणी ईद निमित्त कुर्बानीचा कार्यक्रम झाला . दरम्यान बकरी ईद चा सण शांततेत पार पडावा यासाठी शिरूर पोलीस स्टेशन कडून 4 पोलीस अधिकारी,25 पोलीस अंमलदार,21 होमगार्ड, व एक एस आर पी एफ पथक असा बंदोबस्त नेमण्यात आला होता असे पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी सांगितले
शिक्रापूर येथे वाढत्या नागरीकरणामुळे येथील जामा मस्जिदमध्ये तीन बैठक तर पाट वस्ती येथील तांबोळी मस्जिद मध्ये दोन बैठक मध्ये शांततेत व उत्साहात सामुहिक नमाज पठन करण्यात आले. शिक्रापूरसह परिसरातील सर्व भागांमध्येबकरी ईद कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. तर नमाज पठन नंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले असल्याने सर्वत्र बकरी ईद उत्साहात साजरी झाली आहे.