वाघोलीत पुणे नागरिकांमध्ये सापांबाबत जनजागृतीनिसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून जनजागृती

9 Star News
0
वाघोलीत नागरिकांमध्ये सापांबाबत जनजागृती
निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेकडून जनजागृती
शिरूर ( प्रतिनिधी ) 
वाघोली ता. हवेली येथे बीसपांडा लायब्ररी यांच्या वतीने नुकतेच निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नागरिकांसाठी सर्प जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असताना नागरिकांनी सापांनाबाबत माहिती जाणून घेतली आहे.
                  वाघोली ता. हवेली येथे बीसपांडा लायब्ररी यांच्या वतीने आयोजित सर्प जनजागृती कार्यक्रम प्रसंगी स्वीकृत नगरसेवक शांताराम कटके, संदीप सातव, सेवाधाम विद्यालयाचे प्राचार्य पवन कट्यारमल, सामाजिक कार्यकर्त्या कनिका पांडा, ब्रजेश पांडा यांसह आदी नागरिक व महिला उपस्थित होते. यावेळी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख, उपाध्यक्ष सुरज वाघमारे, सर्पमित्र अभिजित वाघमारे, अमोल डाडर, अमोल कुसाळकर, बाळासाहेब मोरे, शुभम वाघ, श्रेयस डाडर यांनी उपस्थित महिला व नागरिकांना चित्रफितीद्वारे सापांची माहिती नागरिकांमधील देत सापांबाबतचे गैरसमज सर करत सापांचे महत्व सांगत सर्पदंश झाल्यास अथवा सर्प आढळून आल्यास काय करावे याबाबत माहिती सांगितली, तर यावेळी बोलताना सर्पमित्रांचे कारू उल्लेखनिय व समाजहिताचे असल्याचे प्रतिपादन स्वीकृत नगरसेवक शांताराम कटके व संदीप सातव यांनी केले तर सामाजिक कार्यकर्त्या कनिका पांडा यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – वाघोली ता. हवेली येथे सर्प जनजागृती प्रसंगी पदाधिकारी व मान्यवर.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!