शिरूर येथील आर एम डी शाळेचा दहावी बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापक अश्विनी घारू यांनी दिली आहे.
आर एम डी (रसिकलाल माणिकचंद धारिवाल) शाळेने दरवर्षीची परंपरा कायम ठेवली असून यंदाही शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
दहावी बोर्डाच्या 2024 परीक्षेत
सिद्धी सचिन कदम 96.60% शाळेत प्रथम,
गौरी नितीन कर्डिले 95.80% शाळेत द्वितीय,
अर्पिता ज्ञानदेव मोरे 95.60% शाळेत तृतीय,
नम्रता विलास असवले 94. 80% शाळेत चतुर्थ,
प्रज्ञा दीपक जाधव 94.60, शार्वी शैलेंद्र शेळके
94.60% दोघेही शाळेत पाचवा क्रमांक. शाळेमध्ये 90% च्या पुढे 24 विद्यार्थ्यांनी मार्क मिळवले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा,सचिव नंदकुमार निकम सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक अश्विनी घारू यांनी अभिनंदन केले.