शिरूर नगरपालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई कधी?

9 Star News
0
शिरुर , दिनांक प्रतिनिधी 
शिरुर शहर हद्दीत नगरपरिषदेच्या हद्दीत विनापरवाना होर्डिंग लावले असुन नगरपरिषदेकडे एक ही परवानगीची नोंद नसुन इतक्या वर्ष बेकायदेशीर पणे व शासनाचा महसुल हे होर्डिंग मालक बुडवत होते .
शिरुर शहर हद्दीत सतरा कमानी पुल ते पाषाण मळा या पर्यंत नगरपरिषदेची हद्द आहे या हद्दीत साधारण दहा मोठे होर्डिंग लावले आहेत गेल्या अनेक वर्षापासुन हे होर्डिंग बिंधास्त पणे उभे आहेत तसेच त्याच्या वर लाखो रुपयांच्या जाहीराती झळकतात त्या पोटी शासनाला कर भरणे आवश्यक असते मात्र तो कर सुध्दा या होर्डिंग धारकांनी न भरता शासनाची फसवणुक केली आहे .
गेल्या अनेक वर्षापासुन हे होर्डिंग शहरात उभे आहेत मात्र शिरुर नगरपरिषदेने या कडे कानाडोळा केला सर्व सामान्य नागरिकांनी एखादा कर न भरला किंवा परवानगी घेतली नाही तर त्याच्यावर तातडीने कारवाई करणारी नगरपरिषद या होर्डिंग धारकांन बाबत का गप्प आहे या बाबत नागरिकांन मध्ये उलट सुलट चर्चा आहे .
शिरुर शहराच्या बाहेरुन जाणाऱ्या शिरुर पुणे बायपास च्या कडेला बाबुराव नगर हद्दीत सुध्दा अनेक बेकायदेशीर होर्डिंग लागले असुन ते सुध्दा धोकादायक असुन रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना सुध्दा धोका होउ शकतो बिन दास्त लागलेल्या या होर्डिंगवर जाहीराती लावल्या जात आहे मात्र शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीकडे सुध्दा याची नोंद नाही सर्व ठिकाणी आलबेल चालु असुन शासनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे .
शिरुर नगरपरिषदेच्या वतिने मागील वर्षी सर्व होर्डिंग धारकांना नोटीस बजावली होती मात्र परवानगी न घेतल्या मुळे त्यांना कारवाईची अंतीम नोटीस बजावण्यात आली असुन त्यांनी ते स्वता काढले नाही तर शिरुर नगरपरिषद त्यांच्यावर लवकरच कारवाई करणार 
पंकज काकड 
नगररचना सहाय्यक अभियंता शिरुर नगरपरिषद 
फोटो शिरुर शहरालगत असणारे होर्डिंग

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!