श्रीराम सेनेच्या शिवजयंती मिरवणुकीतील स्थावर शिवरायांच्या पुतळ्यासह प्रभू श्रीराम आणि हनुमानाची साकारलेली मूर्ती. शिरूरला मिरवणुकीत देखाव्याचे आकर्षण..

9 Star News
0

 शिरूर प्रतिनिधी: अयोध्येच्या राममंदिरात प्रतिष्ठापना केलेल्या प्रभू श्री रामाची प्रतिकृती आणि त्यापुढे महाबली हनुमानाची मूर्ती तर अग्रस्थानी शिवरायांचा पुतळा. रोषणाईने उजळलेला देखावा आणि आतषबाजी हे चित्र पहावयास मिळाले शिरूर बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्यानजीक. श्रीराम सेनेच्या शिवजयंती उत्सवांतर्गत गुरुवारी सकाळी शिरूर बाजार समितीच्या आवारात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला वैभव जोशी महाराज यांच्या पौरोहित्यात जेष्ठ पत्रकार नितीनभाऊ बारवकर व त्यांच्या पत्नी स्मिता बारवकर यांच्या हस्ते शिव अभिषेक घालण्यात आला. 



त्यानंतर आमदार अॅड. अशोक पवार यांच्या हस्ते आरती आणि शिववंदना झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, युवा नेते अमोल चव्हाण, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, अनिल पवार, संतोष काळे उपस्थित होते. सायंकाळी निघालेल्या मिरवणुकीत प्रभू श्रीरामाची मूर्ती, महिरप उभारली होती. फुलांची सजावटही करण्यात आली होती. याच रथावर हनुमानाची मूर्तीही साकारली होती. मिरवणुकीत असंख्य तरुण भगवे झेंडे नाचवीत सहभागी झाले होते. शहरात ठिकठिकाणी मिरवणुकीवर भगवी कागदी फुले, फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. 

यावेळी खिदमत फाऊंडेशनच्यावतीने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. याप्रसंगी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे, शहर अध्यक्ष शरद कालेवार मिरवणुकीत सहभागी झाले होते. श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जाधव, उत्सव प्रमुख संपत दसगुडे, युवासेनेचे शहर प्रमुख स्वप्नील रेड्डी, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, भाजपचे शहर सरचिटणीस अविनाश जाधव, बजरंग सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेश शेळके, सागर नरवडे, सूरज काळे, महेंद्र येवले, सिद्धांत चव्हाण, तेजस गायकवाड, रणजित गायकवाड, रूपेश घाडगे, सुनील जठार, आकाश चौरे, रूद्र राखुंडे, यश धन्नी, योगेश महाजन, आकाश क्षीरसागर, आदींनी या मिरवणुकीचे संयोजन केले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!