मुंबई, 29 एप्रिल : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी सायन कोळिवाड्याचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
बिनकामाची माणसं जाऊद्या, त्यामुळे शिथिलता आलेला शिवसैनिक पेटून उठेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते शिवसैनिकांशी संवाद साधताना बोलत होते. शुक्रवारी सायन कोळिवाड्याचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर आज सायन कोळिवाडा येथील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आम्ही तुमच्यासोबतच आहोत असं अश्वासन त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

