शिरूर प्रतिनिधी
रांजणगाव येथील तिहेरी हत्याकांड घडलेले ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी भर जोरदारा पावसात भेट देऊन रांजणगाव पोलिसांना तपास करण्याबाबत सूचना दिल्या तर सदर ठिकाणी पेट्रोल टाकून मृतदेह जाळल्याची शक्यता व्यक्त करून पाऊस असल्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळाले नसल्याचे गिल यांनी सांगितले.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस चौकीत ही त्यांनी भेट देऊन घटनेची पूर्ण माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या कडून घेतली.