सावधान आपल्या जिवाशी होतोय खेळ...मांजरी खुर्द हवेलीत भेसळयुक्त पनीरच्या कारखान्यावर छापा..११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
केमिकलचा वापर करून दूध विरहित कृत्रिम पनीर बनवणाऱ्या मांजरी खुर्द येथील एका शेतातील गोदामावर अन्न व औषध प्रशासन विभाग आणि गुन्हे शाखा युनिट ०६ यांनी संयुक्तपणे धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत सापडलेले तब्बल दीड हजार किलो भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले असून सुमारे पावणेबारा लाख रुपयांचा भेसळीचा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहे.
        ही कारवाई गुरुवारी (दि. ६) करण्यात आली. लहान मुलांसह सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळ करणारे कृत्रिम दूध, दही, पनीर आणि तूप अशा अनेक टोळ्या शहर आणि जिल्ह्यात सक्रिय असून, अशा टोळ्यांची काही माहिती मिळाल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
         गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांनी अन्न व औषध प्रशासनाला वाघोली येथे भेसळयुक्त व कृत्रिम पनीर बनविण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिस व अन्न व औषध प्रशासन यांनी एकत्र कारवाई करत वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माणिकनगर, मांजरी खुर्द येथे एका शेतामध्ये असलेल्या गोडाऊनमध्ये धाड टाकली. या ठिकाणी भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम सुरू होते. तेथे गोदाम मालक सोपान साळवे (वय ४५, रा. दुबेनगर, वाघोली, पुणे) यांचे गोदामामध्ये तब्बल १ हजार ४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जीएमएस पावडर, १ हजार ८०० किलो एसएमपी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा एकूण ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या वेळी पंचनामे करून भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!