शिरूर तालुक्यात जनावरांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला रांजणगाव पोलिसांनी पकडले -महादेव वाघमोडे

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
     शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ५ जनावरे पिकअप वाहन असा एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे.
       पद्ममाकर उर्फ नागेश शांताराम मोरे (वय 23 वर्षे, रा. कळंबाड, जि.प.शाळेजवळ, ता.मुरबाड, जि.ठाणे )यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याचा साथीदार नरेश भाऊ मोरे (रा. कळंबाड, जि.प.शाळेजवळ, ता. मुरबाड,, जि.ठाणे ) हा फरार झाला आहे.
       याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी रांजणगाव गणपती लांडे वस्ती ते सोने सांगवी रस्त्यावरील शेतकरी रमेश खेडकर यांच्या गोठ्तील दोन म्हैस चोरी गेल्या होत्या याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे फिरत देण्यात आली होती.
 शेतक-यांचे गोठ्यामधुन जानावरे चोरीच्या घटना घडल्याने शेतकरीवर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकरी गाई, म्हैस पालन करुन दुग्ध व्यवसाय करतात. जनावरे चोरीचा प्रकार हा शेतक-यांच्या दैनंदिन जिवनावरती दुष्परीणाम करणारी घटना असल्याने या घटनेचे कामगिरी ओळखून रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला चोरीस गेलेल्या म्हैशींचा शोध घेणे कामी तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड पोलीस हवालदार विजय सरजिने यांना सुचना दिल्या .
       या तपास पथकाने रांजणगाव, कोंढापुरी, कासारी फाटा, तळेगाव ढमढेरे आष्टापुर, मलठण, कवठे येमाई, शिंगवे पारगाव, नारायणगाव, ओझर, बनकरफाटा, सरळगाव, मुरबाड ठाणे या परिसरातील दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले आरोपी या म्हैशी या त्यांच्याकडील पिकअप गाडीमधुन कळंबाड, ता. मुरबाड, जि.ठाणे येथे गेले असल्याचे निदर्शनास आले. या परिसरात पोलीस पथकाने तपास केला असता एका गोठ्यामध्ये दोन म्हशी दिसून आल्या याबाबत फिर्यादी यांना त्या म्हशी दाखवल्यानंतर त्यांनी त्या ओळखल्या व त्यांच्यात असल्याची पोलीस पथकाला सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणावरून आरोपी पद्माकर मोरे याला अटक केली तर ही चोरी त्यांने त्याचा साथीदार नरेश मोरे यांच्या साथीने केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रांजणगाव गुन्ह्यातील दोन म्हशी व इतर गुन्ह्यातील तीन म्हशी अशा एकूण ५ म्हैस व गुन्ह्यात वापरलेला महिंद्रा कंपनीचा पिकअप गाडी क्र. MH 05 D.K.2761 असा एकुण ७ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
      हे दोन्ही आरोपी सराईत असून त्यांनी रांजणगाव, शिरुर व पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एकुण ४ जनावर चोरीचे गुन्हेची कबुली दिली आहे तर फरार आरोपी नरेश मोरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द घरफोडी, चोरी, जनावरे चोरी सारखे ठाणे ग्रा. जिल्ह्यातील टोकावडे व मुरबाड पोलीस ठाण्यात एकुण 08 गुन्हे दाखल आहेत.
    ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले
यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुंड, पोलीस हवालदार विजय सरजिने, पोलीस हवालदार विलास आंबेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विजय सरजिने करीत आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!