( प्रतिनिधी ) रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील देवाची वाडी मध्ये रामदास लवांडे यांच्या शेतात उसतोड सुरु असताना उसतोड कामगारांना उसाच्या शेतात चक्क बिबट्याचे चार बछडे आढळून आल्याने खळबळ उडाली मात्र शिरुर वनविभागच्या अधिकारी व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्था आणि रेस्क्यू टीमच्या सभासदांनी सदर ठिकाणी धाव घेत बिबट्याच्या पिल्लांना सुरक्षितपणे ताब्यात घेत त्यांच्या आईच्या पुनर्मिलनची कार्यवाही केली आहे.
एकाच वेळी बिबट्याची चार पिल्ले मिळाल्याने देवाची वाडी रांजणगाव गणपती परिसरात शेतीची कामे करणारे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील देवाची वाडी मध्ये रामदास लवांडे यांच्या शेतात उसतोड सुरु असताना ऊसतोड कामगारांना उसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे दिसून आल्याने उसतोड कामगार भयभीत झाले, याबाबतची माहिती नागरिकांनी शिरुरचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांना देताच देताच वनपरिमंडल अधिकारी गणेश पवार, भानुदास शिंदे, नियतक्षेत्र अधिकारी वंदना चव्हाण, प्रमोद पाटील, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व वनविभाग रेस्क्यू टीमचे सदस्य शेरखान शेख, जयेश टेमकर, अमोल कुसाळकर यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता शेतात बिबट्याचे चार बछडे असल्याचे दिसून आले, दरम्यान त्यांनी बिबट्याच्या चारही बछड्यांना ताब्यात घेत सदर बछड्यांना सिरक्षित ठिकाणी हलवत बछड्यांची आईशी पुनर्मिलनची होण्याची कार्यवाही केली, यावेळी रामदास लवांडे, रोहिदास लवांडे, आदित्य मैंद, अतुल वाघ, किरण वाघमारे, गणेश वाघमारे, निलेश खेडकर, नंदू खेडकर यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान नागरिकांनी सतर्क राहून योग्य काळजी घेण्याचे आवाहन नियतक्षेत्र अधिकारी वंदना चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.
फोटो खालील ओळ – रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे आढळून आलेले चार बिबट्याचे बछडे दाखवताना वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व रेस्क्यू टीम.