गणेगाव खालसा या आपल्या गावी प्रसिद्ध उद्योजक प्रकाशभाऊ धारिवाल हे त्यांची कन्या साक्षी हिच्या विवाह निमित्त श्री देवस्थान रोकडोबा यांचे दर्शन घेतल्यानंतर कन्येचा जन्म झाल्यावर प्रथम व लग्ना अगोदर श्री देवस्थान रोकडोबा ग्रामदैवतचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब आलो ही आठवण काढत कुटुंब गावच्या आठवणी सांगताना धारीवाल यांना गहिवरून आले होते.
शिरूर तालुक्याची भूमिपुत्र व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भाऊ धारिवाल यांची कन्या साक्षीदीदी धारिवाल यांच्या विवाह निमित्त त्यांचे मूळ गाव गणेगाव खालसा येथे धारिवाल कुटुंबियांच्या वतीने ग्रामदैवत दंडवत ग्राम प्रदक्षिणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात ढोल ताशा लेझीम च गजरात बैल गाडीतून धारीवाल कुटुंबीयांनी ग्रामदैवत दंडवत कार्यक्रम व सहकुटुंब ग्रामदैवत श्री रोकडोबा देवाचे दर्शन घेतले.
यावेळी उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, त्यांच्या पत्नी दिनाभाभी धारिवाल, भगिनी उज्वलाताई लुंकड, सुरेखाताई चोपडा, कन्या साक्षीदिदी धारीवाल, पुत्र युवा उद्योजक आदित्यशेठ धारीवाल, उद्योजक सतिश धारिवाल. उपस्थित होते.
यावेळी गणेगाव खालसा ग्रामस्थ व पंचक्रोशी यांच्यावतीने धारिवाल कुटुंब यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला तर मोठ्या प्रमाणे ग्रामस्थ महिला पुरुष व संपूर्ण गाव धारिवाल कुटुंबाच्या स्वागतासाठी एकवटला होता.
यावेळी बोलताना उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल म्हणाले आमच्या जन्मा अगोदर आमचे आजोबा पंजोबा या ठिकाणी राजस्थान वरून व्यवसाय करण्यासाठी आले या गावाने आमच्या कुटुंबाला खूप दिले आहे. आपल्या गणेगाव खालसा गावचे ग्रामदैवत रोकडोबा यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्या कुटुंबावर आहे. गावात कुठेही कोणत्याही कुटुंबात शुभकार्य असेल की गावातील नागरिक आम्हाला त्याचे आमंत्रण आवर्जून देतात हेच प्रेम
या गावातील शेतकरी नागरिक यांनी कायमच आम्हाला दिले आहे.
या गावाचं ऋण कधीच फिटू शकत नाही. आपली कर्मभूमी म्हणून या गावात आम्ही नेहमीच येत आहोत. आजही या गावात आमची जमीन आहे आमचा या गावाशी व येथील नागरिकांशी जिव्हाळा प्रेम आहे. माझी मुलगी साक्षी हिच्या जन्मानंतर प्रथम श्री देवस्थान रोकडोबाला आलो होतो.21 जानेवारी तिचा विवाह आहे त्यामुळे ग्रामदैवताला ग्रामप्रदक्षिणा आशीर्वाद घेण्यासाठी साठी येथे आलो आहे. आपल्या गावचे ग्रामदैवत श्री रोकडोबा देवांचे आशीर्वाद घेतले आहे. ग्रामस्थ व पंचक्रोशीतील ग्रामस्थ एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आली हे आमचं भाग्य असल्याचे धारीवाल यांनी सांगितले.