शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या वतीने एक तगडा आणि कोरी पाटी असलेला उमेदवार दिला असून त्याच्या नावातच माऊली आहे. आपण ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराज यांना मानणारी लोक आहोत त्यामुळे वारकरी संप्रदाय व सर्वसामान्य नागरिक माऊली कटके यांना निवडून देतील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला.
शिरूर हवेली विधानसभेचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या प्रचारानिमित्त लोणी काळभोर येथे राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारानिमित्त लोणी काळभोर (ता.हवेली) येथील खोकलाई चौकात शनिवारी (ता.9) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यावेळी यावेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, सुरेश घुले, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, दादा पाटील फराटे, प्रशांत काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, वैशाली नागवडे, पूनम चौधरी चित्तरंजन गायकवाड, योगेश काळभोर, संतोष आबासाहेब कांचन, प्रवीण काळभोर, अमित बाबा कांचन, जितेंद्र बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन व वाघोली या गावातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता. या ग्रामपंचायती नगरपंचायतीच्याही पुढे गेलेल्या आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत व नगर परिषद यांना ग्रामपंचायत पेक्षा जास्त निधी मिळतो. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी येथील जनतेचा होकार असल्यास, या भागासाठी हडपसर महानगरपालिकेचे नियोजन आहे.
यशवंत कारखान्याची ची 225 एकर जागा आहे. या जागेपैकी 100 एकर जागेमध्ये अत्याधुनिक पद्धतीची कृषी उत्पन्न बाजार समिती व राहिलेल्या जागेमध्ये यशवंत कारखाना नव्याने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेऊ. विकासकामासाठी कोठेही कमी पडणार नाही. विरोधकांच्या खोट्या अफवांना बळी पडू नका. मला जर कारखाना बंद पडायचा असता तर घोडगंगा कशाला व्येंकटेश बंद पडला असता. बंद पडलेला कारखाना मुलाच्या हाती दिला आहे. कसा तो तरी चालू करणार? मी काही जास्त बोलणार नाही. परंतु, तुम्हा सर्वांना माहिती आहे. भावकी कशी असते ते.
राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजना आणली असून या योजनेच्या माध्यमातून आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवण्यात आले आहे त्यासाठी राज्य शासनाने 45000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे तर शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
शिरूर हवेली तालुक्यातील जनतेच्या खूप समस्या आहेत. खडकवासला धरणातून शेतीसाठी पाणी आवर्तन सोडण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो प्रश्न लवकरच मार्गी लावू. पण, शिरूर हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांना प्रचंड मतांनी विजयी करा. तुंम्ही विकासाची चिंता करून नका. शिरूर हवेलीच्या तालुक्याच्या विकासासाठी पुढील पाच वर्षात ५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ. असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले आहे.
यावेळी बोलताना शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली म्हणाले शिरूर हवेली मतदार संघामध्ये सर्वसामान्य शेतकरी व उत्पादक यांच्या जिव्हाळ्याचा प्रशांत म्हणजे यशवंत सहकारी साखर कारखाना व घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे हा बंद पडलेला कारखाना सुरू करण्याची धमक जर कोणात असेल तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात असून दादा की जातीने याकडे लक्ष देऊन हे दोन्ही कारखाने सुरू करावी अशी शिरूर हवेली तालुक्यातील जनतेच्या व शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करून शिरूर हवेली तालुक्यात सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीमध्ये या भागातील तरुणांना नोकरी मिळाव्यात यासाठी आजपर्यंत कोणी मानावे असे प्रयत्न केले नाही परंतु या पुढील काळामध्ये या भागातील तरुणांना या औद्योगिक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या कशा मिळतील यासाठी प्रयत्न करावे तसे चासकमान कालव्याचा प्रश्न व हेट टू टेन चा प्राणी प्रश्न हा सोडवण्यासाठी तुम्ही मदत करावी अशी मागणी ही कटके यांनी राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. तसेच पुणे नगर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व सोलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी हा प्रमुख प्रश्न असून या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकोटीला आला आहे त्याला या वाहतूक कोंडी च्या त्रासातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ठोस पावले उचलावी असेही माऊली कटके यांनी अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. या भागातील समस्या सोडवण्यासाठी मला संधी द्या असेही माऊली कटके म्हणाले.