शिरूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करून शिरूर लोकसभेचे माजी खासदार बाहेर येताच पत्रकारांनी बाईट म्हणताच महाशयांनी हात जोडले बाईट द्यायची नाही म्हणून रुसून बाजूला गेल्याने यावेळी मात्र पत्रकाराच्या चौथ्या स्तंभच्या ताकदीचे (दहशतीचे)उदाहरण दिसून आल्याने उपस्थित सर्वांनी गालातल्या गालात हसून विषय हसण्यावारी नेला. ..
आज शिरूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता मोठ्या प्रमाणात तहसिल कार्यालय येथे गर्दी झाली होती प्रिंट मीडियापासून ते पोर्टल व इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सर्वच पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते.
सकाळपासून इच्छुक उमेदवार आपल्या उमेदवारी अर्ज भरत होते त्यानंतर पत्रकार फोटो व अनेकांची बाईट घेत होते.
शिरूर विधानसभेच्या एका उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी हे महाशय माजी खासदार आले होते. उमेदवारी अर्ज भरताच तहसील कार्यालयाच्या वरंड्यामध्ये पत्रकारांनी उमेदवारी अर्ज भरलेले व खासदार साहेबांना बाईट द्या म्हणताच..... तू का असे म्हणत तुझ्यामुळे..... असे म्हणून बाईट नको रे बाबा असे रुसत माजी खासदार बाजूला जाऊन उभे राहिले. यावेळी त्यांचा चेहरा पाहण्यासारखा होता.... तर पत्रकारांनी मात्र त्यांच्या लेखणीची व पत्रकारितेची दहशद माजी खासदार घेतात यामुळे थोडाफार आनंद व्यक्त केला.
कारण आज समजले असेल पत्रकारितेमध्ये काय ताकद आहे. यावेळी उपस्थित पक्षाचे कार्यकर्ते व नेते हे आवाक होऊन नक्की काय झाले हे एकमेकांना विचारत होते.
परंतु ही पत्रकारितेची दहशत नसून चौथ्या स्तंभाची ताकद असल्याचे पत्रकारांनी चर्चा करताना एकमेकांना सांगितले.