केंदूरमध्ये नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हाप्रेमविवाहानंतर चार महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या प्रकरण

9 Star News
0
शिरूर 
( प्रतिनिधी ) केंदुर ता. शिरुर येथे एका युवकाचा प्रेमविवाह झाल्यानंतर त्याने पत्नीला दिलेल्या त्रासाने पत्नीने प्रेम विवाहानंतर चारच महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल बबन साकोरे याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                         केंदूर ता. शिरुर येथील पाचवड वस्ती येथे राहणाऱ्या विशाल साकोरे याचा साक्षी दौंडकर सोबत मे २०२४ मध्ये प्रेमविवाह झाला होता, त्यांनतर विशाल वारंवार साक्षीच्या वडिलांना कामासाठी पैसे मागत होता तसेच घरातील वादातून साक्षीला मारहाण करत होता, वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून साक्षी साकोरे हिने ४ सप्टेबर २०२४ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सदर घटनेत नवविवाहिता साक्षी विशाल साकोरे वय २२ वर्षे रा. पाचवड केंदूर ता. शिरुर जि. पुणे हिचा मृत्यू झाला असून याबाबत साक्षीचे वडील बाळासाहेब दगडू दौंडकर वय ५१ वर्षे रा. कन्हेरसर ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी विवाहितेचा पती विशाल बबन साकोरे रा. पाचवड केंदूर ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!