शिरूर पंचायत समिती बी ओ टी प्रकल्पातील गाळा नावावर करण्यासाठी महिलेने केलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे

9 Star News
0
शिरूर पंचायत समिती बी ओ टी प्रकल्पातील गाळा नावावर करण्यासाठी महिलेनेकेलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे 
शिरूर दिनांक १३ प्रतिनीधी 
शिरूर पंचायत समिती बी ओ टी प्रकल्पातील ठेकेदार गाळा नावावर करू देत नसल्याने उपोषणास बसलेल्या महिला सीमा गिरमकर लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आहे. 
      शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते सरबत देऊन हे उपोषण सोडवण्यात आले आहे.
      शिरूर पंचायत समिती ब बीओ टी प्रकल्पातील गाळा करीता दहा लाख रुपये देऊनही गाळा नावावर होत नसल्याने व ठेकेदाराची मनमानी व दडपशाहीला कंटाळून शिरूर येथील हॉटेल व्यवसायिक महिला सीमा गिरमकर यांनी  शिरूर पंचायत समिती कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले होते या उपोषणाचा दुसरा दिवस होता.१५ऑगस्ट रोजी आत्महत्या करण्याचा इशाराही दिला होता.
 याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश डोके, मे. महिंद्रा रिअलटर्स इन्फ्रा यांचे प्रतिनिधी हिमांशू शहा व  मनोज छावछरीया व उपोषणकर्ते यांचे पती  राहुल गिरमकर, दत्तात्रय पठारे, उपअभियंता व  अनिल गावडे, शाखा अभियंता महिला सामाजिक कार्यकर्ते शशिकला काळे, डॉ. वैशाली साखरे, उषाताई वाखारे, निलेश वाळुंज, शिवाजी खेडकर, प्रितेश फुलडाळीया पत्रकार व काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
 आज शिरूर पोलीस स्टेशन येथे बैठक घेऊन योग्य तोडगा काढला व महिलेने राहिलेले एक लाख 78 हजार रुपये जमा करून जिल्हा परिषद पुणे ज्यावेळेस या गाळ्याचे रजिस्टर करायला सांगेल त्या दिवशी महिलेला गाळा नावावर करून देणार असल्याचे ठेकेदाराचे प्रतिनीधी यांनी सांगितल्यानंतर हे उपोषण मागे घेतले. 
लेखी निवेदन 


     
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!