शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरूरचे उद्योगपती स्व.रसिकलालजी माणिकचंदजी धारिवाल यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आर एम् डी फाउंडेशनने मदनबाई धारिवाल हॉस्पिटल शिरूर आणि पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक यांच्या सहकार्याने शल्यचिकित्सक आणि ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करून ४०० रुग्णाची तपासणी करून ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना 50% सवलती शस्त्रक्रिया उपलब्ध केल्या असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे सीईओ बेहराम खोडाजी यांनी दिली आहे.
तर १ मार्च ते ३१ मार्च या महिन्याभराच्या कालावधीत हे मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने शिबिराची मुदत १५ एप्रिल २०२४ पर्यंत वाढवण्यात आली असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रुबी हॉल क्लिनिकचे प्रकल्प प्रमूख डॉ.अरविंद जैन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळीऑपरेशन हेड वंदना सागवेकर उपस्थीत होत्या
डॉ. अरविंद जैन यांनी सांगितले की, या शिबिराच्या माध्यमातून रुबी हॉल क्लिनिकमधील उत्कृष्ट डॉक्टरांकडून ५०% सवलतीच्या शस्त्रक्रिया केल्या जातील, ज्याचा गरजू व्यक्तींना फायदा होईल.
यावेळी बेहराम खोडाजी यांनी रुबी हॉल क्लिनिक यांचे वतीने धारिवाल रुग्णालयात नवीन तंत्रज्ञानाद्वारे प्रगत विशेष उपचार सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे शिरूरच्या रहिवाशांना हृदयविकाराच्या उपचारांसाठी पुण्याला जाण्याची गरज भासणार नाही. इतर आजारांवर ही चांगले उपचार मिळणार असून शिरूर, पारनेर , श्रीगोंदा हे 3 तालुके आरोग्य सेवा स्वयंपूर्ण बनवून या उपक्रमाचा केवळ शिरूरच नाही तर आसपासच्या गावातील रहिवाशांनाही फायदा होणार आहे. शिरूर व आसपासच्या गावातील गरीब रुग्णांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.
